5 वर्षीय मुलाच्या दत्तक प्रक्रियेसाठी संपुर्ण वर्गाने लावली न्यायालयात हजेरी

केंट काउंटीच्या 23व्या दत्तक दिनानिमित्त मिशिगन येथील एका मुलाला दत्तक घेण्याची कारवाई पुर्ण करण्यात आली. हा दिवस 5 वर्षीय मायकल क्लॅक ज्यूनियरसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता.  या दत्तक घेण्याच्या कायदेशीर कारवाई दरम्यान मायकल आपल्या किंडरगार्डन क्लासच्या सर्व मित्र-मैत्रिणींसह न्यायालयात पोहचला. सुनावणी दरम्यान मायकल आई-वडिलांबरोबर पुढे बसला होता, तर त्याचे शाळेतील मित्र-मैत्रिणी मागे बसले होते.

Michael brought his entire kindergarten class with him today to witness his adoption.

Posted by Kent County, Michigan on Thursday, December 5, 2019

केंट काउंटीने फेसबुकवर या लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, मायकल दत्तक घेण्याच्या या क्षणाचे साक्षी होण्यासाठी पुर्ण किंडरगार्टन क्लासलाच घेऊन आला.

फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक वेळा ही पोस्ट शेअर झाली असून, 14 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. मायकलच्या या स्टोरीने नेटकऱ्यांचे मन जिंकले. अनेकांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मिशिगन सुप्रीम कोर्टाने देखील ट्विट करत मायकलचे फोटो शेअर केले. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, मायकलचा हा खास दिवस शेअर करताना खूप आनंद होत आहे.

Leave a Comment