ही आहे जगातील सर्वात हलकी मिठाई


गोडाची आवड आहे पण मधुमेह, वजन वाढीच्या भीतीने जास्त प्रमाणत गोड खाता येत नाही अश्या लोकांसाठी एक गोड बातमी आहे. केवळ एक ग्राम वजन असलेली एक अनोखी मिठाई तयार केली गेली असून ही जगातील सर्वात हलकी मिठाई आहे. यात ९६ टक्के केवळ हवा आहे आणि घनपदार्थाचे प्रमाण फक्त ४ टक्के आहे. त्यालाच गोडवा दिला गेला आहे.

ब्रिटनच्या हलवायांनी ही मिठाई तयार केली पण त्यासाठी वैज्ञानिकांचे सहाय्य घेतले गेले. लंडन मधील डिझाईन स्टुडीओ बोम्पास अँड पारच्या कारागिरांनी ही मिठाई तयार केली आणि त्यासाठी एरोजेलेक्स लॅबॉरेटरी मधील वैज्ञानिकांचे सहाय्य घेतले. ही मिठाई जर्मनीतील हँम्बुर्ग मध्ये तयार केली गेली. या मिठाईसाठी एरोजेल हा जगातील सर्वात हलका पदार्थ वापरला गेला आणि तो प्रथम खाण्यालायक बनविला गेला आणि नंतर त्याला गोडवा दिला गेला.

एरोजेलचा शोध अमेरिकन रसायनतज्ञ सॅम्यूअल क्रिस्टलरने १९३१ साली लावला. यात ९५ ते ९९ टक्के हवा असते त्यामुळे हा जगातील सर्वात हलका घनपदार्थ ठरला. त्यातून मिठाई बनविण्याची कल्पना हलवायाना सुचली. त्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या बलाकातील एका प्रोटीनचा वापर करून त्यापासून हायड्रोजेल बनविले गेले आणि त्यातून मिठाईसाठीचा घनपदार्थ बनविला गेला. या मिठाईचा स्वाद नक्की कसा याची माहिती अद्याप मिळालेली नही मात्र जिभेला थोडा गोडवा त्यातून नक्कीच मिळणार आहे. ही मिठाई ऑक्टोबर २०१९ मध्ये सौदीच्या किंग अब्दुल अजीज सेंटर फॉर वर्ल्ड कल्चर मध्ये सादर केली गेली होती असे समजते.

Leave a Comment