हैदराबाद एनकाऊंटरचे बाबा रामदेव यांच्याकडून समर्थन


नवी दिल्ली – आज पहाटे 3 च्या दरम्यान हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एनकाऊंटरमध्ये ठार झाले. त्यांना पोलीस अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी बंदुक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यावेळी गोळीबार करण्यात आला. आता या घटनेवर सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशाच प्रकारची कारवाई बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर झाली पाहिजे. ज्या घटनांबाबत साशंकता असेल तेव्हाच न्यायालयात जायला हवे, असल्याचे म्हणत त्यांनी या एनकाऊंटरचे समर्थन केले.

अशाप्रकारचे अपराधी आपल्या समाजासाठी कलंक असतात. संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती अशा लोकांमुळे बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी, असे परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. एखाद्या घटनेबाबत काही साशंकता असेल न्यायालयापर्यंत त्या घटना नेल्या पाहिजेत. कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब त्यावेळीच केला पाहिजे.

Leave a Comment