आरबीआयच्या नावाने आलेल्या या मेसेजमुळे रिकामे होईल तुमचे खाते

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. खासकरून व्हॉट्सअ‍ॅपवर तर मेसेजची सत्यता न तपासता सर्रास फॉरवर्ड केले जातात. मात्र यातील काही मेसेज धोकादायक ठरू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर हा मेसेज RBI WhatsApp Global Award नावाने शेअर होत आहे. या मेजेससोबत एक लिंक देखील देण्यात आलेली आहे. मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपनंबरला 2 कोटी 75 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. ही रक्कम घेण्यासाठी मोबाईल नंबर, वय खालील दिलेल्या लिंकमध्ये भरावे. या लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सकडून तुमच्या बँकेची माहिती चोरली जाते.

हा मेसेज पुर्णपणे फेक असून, या मेसेजच्या जाळ्यात अडकू नका. आरबीआयसोबतच अन्य बँकादेखील आपल्या ग्राहकांना याबाबत सतर्क करत आहेत. जर तुमच्याकडे देखील असा मेसेज आला असेल तर त्वरित डिलीट करा व दुसऱ्यांना याबाबत माहिती द्या.

Leave a Comment