या धबधब्यातून पाणी नाही ‘आग’ कोसळते

तुम्ही धबधब्यातून नेहमी पाणी पडताना पाहत असाल, मात्र तुम्ही कधी धबधब्यातून कधी आग कोसळताना पाहिली आहे का ? नाही ना. मात्र अमेरिकेती कॅलिफोर्निया येथी एका धबधब्यातून जणू आगच कोसळते असे वाटते.

कॅलिफोर्निया योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा 1560 फूट उंच आहे.

या धबधब्याला ‘फायरफॉल’ म्हणजेच ‘आगीचा धबधबा’ देखील म्हटले जाते. परदेशी पर्यटक देखील हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतात.

फेब्रुवारीच्या शेवटी या धबधब्यातून जणू आगच कोसळत असल्याचे दिसून येते. मात्र ही आग नाही. सुर्यास्ताच्या जवळ असल्याने या रंगात हा धबधबा बदलतो.

सुर्यास्त पर्वताच्या दुसऱ्याबाजून होतो. म्हणजेच धबधब्याच्या उलट्या बाजूने सुर्यास्ताचा प्रकाश धबधब्यावर पसरतो. त्यामुळे पाहताना असे वाटते की, जणू पाण्याच्या ऐवजी आगच कोसळत आहे.

Leave a Comment