नोकियाचा 4,000mAh बॅटरी असणारा दमदार फोन लाँच

टेक कंपनी एमएचडी मोबाईलने इजिप्तची राजधानी कायरो येथे नोकिया 2.3 स्मार्टफोन लाँच केला आहे. याआधी कंपनीने नोकिया 8.1 आणि 5.2 हे फोन भारतासह अनेक देशात लाँच केले आहेत. कंपनी लवकरच नोकिया 2.3 भारतीय बाजारात लाँच करणार आहे.

कंपनीने या फोनची किंमत 109 यूरो (जवळपास 8600 रुपये) ठेवली आहे. हा फोन क्यान ग्रीन आणि सँड रंगात मिळेल.

(Source)

नोकिया 2.3 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 720×1520 पिक्सल आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी यात क्वॉडकोर मीडियाटेक हेलियो ए22 चिपसेट प्रोसेसर मिळेल. यात अँड्राईड पाय 9 ऑपरेटिंग सिस्टम आहे. याशिवाय फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

(Source)

या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे.      ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

या फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5एमएम हेडफोन सारखे फीचर्स मिळतील.

Leave a Comment