राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली हैदराबाद एनकाऊं दखल


नवी दिल्ली – शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर केले. सकाळपासूनच माध्यमांतून या घटनेचे वृत्त प्रसारित होत होते. त्यानंतर यावर अनेक क्षेत्रातून उलट-सुलट प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी करुन चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश विशेष पथकाला दिले आहेत.

यासंदर्भात आयोगाने तपास विभागाच्या पोलीस उपमहासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले असून एन्काऊंटर झालेल्या घटनास्थळाला तातडीने भेट देऊन या घटनेतील तथ्य तपासण्याचे या पथकाला आदेश देण्यात आले आहेत. या एन्काऊंटर संदर्भातील बातम्या सुरुवातीला केवळ माध्यमांमधूनच प्रसारित होत होत्या. त्यानंतर घटनेच्या सुमारे १० तासांनंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैदराबाद पोलिसांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तत्पूर्वी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलिसांची भुमिका स्पष्ट होत नसल्याने याची गंभीर दखल घेत संदर्भात सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली. तसेच तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेशही दिले.

Leave a Comment