या हॉटेलमध्ये इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणाऱ्याला मिळते मोफत जेवण

तुम्ही अशा हॉटेलबद्दल ऐकलेच असेल, जेथे प्लास्टिक दिल्यावर मोफत जेवण मिळते. मात्र तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का, जेथे इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केल्यावर मोफत जेवण दिले जाते ? हो, असे एक हॉटेल इटलीच्या मिलान शहरात आहे. या हॉटेलचे नाव ‘दिस इज नॉट अ सुशी बार’ आहे.

हे एक जापानी हॉटेल आहे. मागील वर्षी मॅटियो आणि तोमोसो पिट्टरेल्लो या दोन भावांनी हे हॉटेल चालू केले होते.

(Source)

या हॉटेलमध्ये मोफत जेवण घेण्यासाठी तुम्हाला एक प्लेट जेवण ऑर्डर करावे लागेल. त्यानंतर त्या जेवणाचा आणि हॉटेलचा एक फोटो #Thisisnotasushibar हॅशटॅगवापरून इंस्टाग्रामवर पोस्ट करावा लागेल.

(Source)

इंस्टाग्रामवर तुमचे किती फॉलोवर्स आहेत, त्याच आधारावर हे हॉटेल तुम्हाला मोफत जेवण देईल. जर तुमचे 1000 ते 5000 फॉलोवर्स असतील व तुम्ही फोटो अपलोड केला असेल तर तुम्हाला एक प्लेट सुशी मोफत मिळेल.

(Source)

जर तुमचे फॉलोवर्स 5 ते 10 हजारांच्या मध्ये असेल तर तुम्हाला 2 प्लेट मोफत मिळेल. 50 हजार असेल तर 4 प्लेट आणि 1 लाख फॉलोवर्स असतील, तर तुम्ही 8 प्लेट जेवण मोफत खावू शकता.

Leave a Comment