‘या’ दिवशी रिलीज होणार ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आगामी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. त्यांनी आपल्या प्राणाजी बाजी लावून कोंढाणा गड सर केला होता. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट आता मराठी भाषेतही रिलीज करण्यात येणार आहे.


मराठी भाषेतील चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, मराठी ट्रेलर १० डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात मराठी भाषेतही रिलीज करण्यात येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत आहेत. अजय देवगनसोबत सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोलच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. १० जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment