‘पाण्या’ने 1000 किमीपर्यंत चालणार ह्युंडाईची नवीन एसयूव्ही

ह्युंडाई मोटर्स लवकरच भारतात एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. ह्युंडाई कोना ईव्हीनंतर भारतात लाँच होणारी कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार असेल.  या एसयूव्हीमध्ये हायड्रोजन फ्यूल सेल लावलेले असतील व याची रेंज 1000 किमीपर्यंत असले.

ह्युंडाई नेक्सोला फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हिकल्स (FCEV) देखील म्हटले जाते. यात ग्रीन हाउस गॅस उत्सर्जित न होता, केवळ पाण्याचे उत्सर्जन होते. यामध्ये लावलेले हायड्रोजन फ्यूल सेल गाडीमधील इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतात. FCEV बद्दल म्हटले जाते की, हे 99.99 टक्के प्रदूषण तत्वांना फिल्टर करते.

(Source)

रिपोर्टनुसार, नेक्सोमधील हायड्रोजन फ्यूल सेल्समुळे याची रेंज 600 किमीपर्यंत जाते. ह्युंडाई मोटर इंडियाच्या सीईओंनी दावा केला आहे की, भारतात लाँच होणारी नेक्सो 1000 किमीपर्यंतच अंतर गाठू शकते.

(Source)

परदेशात मिळणाऱ्या नेक्सोची इलेक्ट्रिक मोटर 163 पीएसची पॉवर आणि 395 एनएमचा टॉर्क देते. केवळ 9.2 सेंकदात ही कार ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते. नेक्सोची टँक क्षमता 156.6 लीटर आहे. यामध्ये तीन हायड्रोजन टँक आहेत, ज्यातील प्रत्येकाची क्षमता 52.2 लीटरची आहे. नेक्सोला 5 दरवाजे असताली व ही फाइव्ह सीटर स्पोर्ट्स यूटिलिटी व्हिकल असेल.

(Source)

ह्युंडाई नेक्सोची खास गोष्ट म्हणजे ही 5 मिनिटातच रिफ्यूल होईल. इतर इलेक्ट्रिक कारला फूल चार्जिंगसाठी कमीत कमी 1 तास लागतो. कंपनीने ही एसयूव्ही मागील वर्षी दिल्लीतील इंडिया-कोरिया समिटमध्ये सादर केली होती. ही एसयूव्ही 2021 पर्यंत लाँच होवू शकते.

Leave a Comment