एमजी मोटर्सने भारतात सादर केली नवीन इलेक्ट्रिक कार

एमजी मोटर्सने देशातील दुसरी इलेक्ट्रिक कार एमजी झेडएस ईव्हीवरील पडदा हटवला आहे. कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक क्रॉस ओव्हर कार आहे. ही कार जानेवारी 2020 मध्ये लाँच होणार आहे.

एमजी मोटर्सने आपली पहिलीच एसयूव्ही एमजी हेक्टरद्वारे देशात ऑटो सेक्टरमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले होते. या नवीन इलेक्ट्रिक कारची किंमत 25 लाखांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

(Source)

MG ZS EV मध्ये 44.5 kWh चा बॅटरी पॅक मिळेल. जे 143 पीएसची पॉवर आणि 353 एनएम टॉर्क जनरेट करेल. कंपनीने दावा केला आहे की, ही बॅटरी केवळ 40 मिनिटात 50 kW DC  च्या फास्ट चार्जरने 80 टक्के चार्ज होईल. तर 7kW च्या चार्जरने 7 तास लागतील. फूल बॅटरी चार्जिंगद्वारे हे कार 340 किमीपर्यंत चालू शकते. या कारची लांबी 4314 एमएम, रुंदी 1809 एमएम आणि उंची 1620 एमएम असेल. याचे व्हिलबेस 2579 एमएम असतील.

(Source)

कंपनी ही एसयूव्ही दिल्ली-एसीआर, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये लाँच करेल. कंपनीने या शहरातील डिलर्सकडे फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध केले आहेत. कारमध्ये OTA म्हणजेच ओव्हर-द-एअर सॉप्टवेअर अपडेट टेक्नोलॉजी मिळेल. सोबतच यात 8 इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम मिळेल. जे अँड्राईड ऑटो आणि अपल कार प्ले सपोर्ट असेल.

(Source)

टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टममध्ये टॉम टॉम नेव्हिगेशन, वाय-फाय, सीओ2 सेव्हिंग, क्रुज कंट्रोल iSmart EV 2.0 ची सुविधा मिळेल. तसेच कारच्या कॅबिनमध्ये प्रदूषणापासून वाचण्यासाठी आणि स्वच्छ हवेसाठी PM 2.5 एअरफिल्टर देखील मिळेल. कंपनीचा दावा आहे की, ही देशातील पहिली प्यूर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असेल.

Leave a Comment