एनकाऊंटरनंतर सोशल मीडियात होत हैदराबाद पोलिसांचे कौतुक


हैदराबाद : पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या निर्घृण हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी हैदराबाद पोलिसांच्या या धडक कामगिरीनंतर आनंद व्यक्त केला आहे. हैदराबादच्या पोलिसांचे सोशल मीडियावरूनही कौतुक केले जात आहे. तर पोलिसांच्या कारवाईवर काहींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देशातील न्यायव्यवस्थेवर लोक अशा प्रकारे कारवाई केल्याने विश्वास ठेवणार नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस एन्काउंटरमध्ये चारही आरोपी मारले गेल्यानंतर आनंद व्यक्त करत, हैदराबाद पोलिसांचे आभार मानले. या एन्काउंटरनंतर सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारवाईचे काहींनी कौतुक केले, तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी मारले गेल्याचे वृत्त समजल्यानंतर शाळेतील मुलींनीही आनंद व्यक्त केला. पण काहींनी सोशल मीडियावरून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सॅल्यूट ठोकले, तर काहींनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा प्रकारे देशातील न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहणार नसल्याचे काहींनी म्हटले आहे.

एका यूजरने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अशाच प्रकारच्या न्यायाची अपेक्षा होती. हैदराबाद पोलिसांचे आभार. अन्य राज्यांतील पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून धडा घ्यावा, अशी अपेक्षा आहे. बलात्कार करणाऱ्यांचा एन्काउंटर करण्यास समर्थ असले पाहिजेत, असे म्हटले आहे. लोकांच्या भावना लक्षात घेऊन कुणाला ठार मारणे हे खूप भयानक असून त्यांचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होणे गरजेचे होते. १०० अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरापराध्याला शिक्षा होता कामा नये. न्यायव्यवस्थेसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे मत अन्य एका यूजरने व्यक्त केले.

त्याचबरोबर एक युजरने ही कारवाई पूर्णपणे चुकीची आणि अस्वस्थ करणारी असून कायद्यानुसारच त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी होती. हा संविधानावरील विश्वास नाही, तर असंवैधानिक कृत्याचे कौतुक केले जात असल्याचे म्हटले आहे. न्याय देण्याचा हा मार्ग योग्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. काय योग्य-अयोग्य हे जाणून नाही घ्यायचे. फक्त न्याय मिळाला एवढेच मला म्हणायचे असल्याचे एका अन्य यूजरने म्हटले आहे.

Leave a Comment