मुलींच्या शिक्षणासाठी दररोज 12 किमी पायपीट करतात वडील

अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींबद्दल समाजात विचार बदल आहेत. याचे उदाहरण मिया खान हे आहेत. मिया खान आपल्या मुलींना शिकवण्यासाठी दररोज 12 किमी शाळेपर्यंत घेऊन जातात. जो पर्यंत मुलींचा क्लास सुरू असतो, तोपर्यंत 4 तास ते तेथेच थांबतात. जेव्हा शाळा संपते, त्यावेळी त्यांना घेऊन पुन्हा घरी येतात. एनजीओ स्वीडिश कमेटी फॉर अफगाणिस्ताननुसार, मिया खान दररोज बाईकवरून आपल्या तीन मुलींना नूरिनियां शाळेत सोडण्यासाठी 12 किमी प्रवास करतात.

या एनजीओने मिया खान यांची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ते आपल्या परिवारासोबत अफगाणिस्तानच्या शाराना येथे राहतात. ते म्हणाले की, मी अशिक्षित आहे. मी मजूरी करतो आणि आपल्या कुटूंबाचे पोट भरतो. आमच्या भागात एकही महिला डॉक्टर नाही, त्यामुळे मुलींचे शिक्षण गरजेचे आहे. याच कारणामुळे माझी इच्छा आहे की, त्यांनी खूप शिकावे व पुढे जावे.

#16DaysOfActivisimA father who considers educating his daughters a dutyA resident of central Sharana of Paktika…

Posted by Swedish Committee for Afghanistan on Monday, December 2, 2019

त्यांची तीन मुलींपैकी एक मुलगी रोजीने सांगितले की, मी आनंदी आहे, कारण मला शिकायला मिळत आहे. आता मी सहावीत आहे. माझे वडील रोज घरून शाळेत आणि शाळेतून घरी बाईकवर सोडतात. कधीकधी भाऊ देखील मदत करतो.

मिया खान यांची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्स त्यांचे कामाचे कौतूक करत आहे. एका युजरने लिहिले की, अशा वडिलांवर गर्व आहे. .. ते एक खरे हिरो आहेत. मी त्यांचा सन्मान करतो.

Leave a Comment