हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांची यमसदनी रवानगी


हैदराबाद : हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या करणारे ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले आहेत. पळून जाण्याचा प्रयत्न हे आरोपी करत असताना त्यांना थांबवण्याचे पोलिसांनी प्रयत्न केले. पण पोलिसांच्या आवाहनाला ते दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. संपूर्ण देशात बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

या वृत्ताला हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. या ४ आरोपींना तपासादरम्यान पोलीस घटनास्थळी नेत होते. पण, हे चारही आरोपी दरम्यानच्या काळात पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. पोलिसांनी त्यानंतर या चौघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांना चौघांवर गोळ्या झाडाव्या लागल्या. यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला. पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणाचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.

या ४ आरोपींची शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी नावे आहेत. पोलीस कोठडीत या चौघांना ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्यांना तपासाचा एक भाग म्हणून घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते. पण या दरम्यान या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. चारही आरोपी पळून जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणानंतर या चौघांना फाशी द्यावे, अशी मागणी देशभरातून होत होती.

Leave a Comment