2500 सीसीचे दमदार इंजिन असणारी बाईक भारतात लाँच

ब्रिटिश मोटरसायकल कंपनी ट्रियूम्प मोटारसायक्लसने आपली नवीन बाईक ‘रॉकेट 3’ भारतीय बाजारात लाँच केली आहे. भारतात या बाईकची किंमत 18 लाख रुपयांपर्यंत आहे. ट्रिम्पूयप रॉकेट 3 ही बाईक आर आणि जीटी या दोन व्हेरिएंटमध्ये जागतिक बाजारात उपलब्ध आहे. मात्र भारतात सध्या केवळ रॉकेट 3 आर हे व्हेरिएंटच लाँच करण्यात आले आहे.

नवीन Triumph Rocket 3 स्टाइलिश राउंड हेडलँम्पस, टिअरट्रॉप फ्यूल टँक देण्यात आले आहे. याशिवाय या बाईकची संपुर्ण फ्रेम एल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेली आहे.

(Source)

या सुपरबाईकमध्ये खास 2500सीसी 3 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 6000 आरपीएमवर 165 पीएसची पॉवर आणि 4000 आरपीएमवर 221 टॉर्क देते. याच्या इंजिनमध्ये 6 स्पीड गियरबॉक्स आहे.

(Source)

फ्रंट ब्रेकसाठी ड्यूल 320 मिलीमीटर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. फ्रंटला कॉनरिंग एबीएस फीचर देण्यात आलेले आहे. याशिवाय रिअर ब्रेकसाठी सिंगल 300 मिलीमीटर डिस्क ब्रेक मिळेल.

(Source)

या बाईकमध्ये 4 रायडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नेरिंग एबीएस, हिल्ड होल्ड कंट्रोल मिळेल. याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टेड टीएफटी डॅश बाईकमध्ये देण्यात आलेले आहे.

Leave a Comment