ही आहेत भारताची ओळख असलेली 500 वर्ष जुनी 12 ऐतिहासिक स्थळे

भारत आपली सभ्यता, संस्कृति, कला, धर्म या गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आपल्या ऐतिहासिक स्थळांसाठी जगप्रसिद्ध आहे. याचमुळे युनेस्कोकडून भारतातील एकूण 36 ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

आज अशाच 12 जागतिक वारसा स्थळांविषयी जाणून घेऊया, जी 500 वर्षांपेक्षा जुनी आहेत.

(Source)

आग्रा फोर्ट (वर्ष 1565) – 

16 व्या शतकात बांधण्यात आलेला आग्र्याचा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. हा किल्ला ताजमहालपासून 2.5 किमी अंतरावर आहे. मुघल शासक बाबर, हुमायू, अकबर, जहांगीर, शहांजहा आणि औरंगजेब यांनी येथूनचा भारतावर शासन केले.

(Source)

मेहरानगड किल्ला (वर्ष 1459) –

मेहरानगड किल्ला राजस्थानच्या जोधपूर शहरात आहे. हा 500 वर्षांपेक्षा जुना आणि सर्वात मोठा किल्ला आहे. हा किल्ला राव जोधा यांनी बांधला होता. या किल्ल्याला एकूण 7 गेट आहेत. प्रत्येक गेट राजाचा युद्धात विजय झाल्यानंतर स्मारक म्हणून तयार करण्यात आले होते.

(Source)

कोणार्कचे सुर्य मंदिर (वर्ष 1250)

13 व्या शतकातील कोणार्कचे सुर्य मंदिर ओडिसामध्ये आहे. आपल्या वास्तूकलेसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित आहे. या किल्ल्याचे निरक्षण केल्यावर असे वाटते की, जणू 7 घोडे आणि 12 जोडी चाकांचा एखादा रथच उभा आहे.

(Source)

राणीची वाव (वर्ष 1063)

11 व्या शतकात तयार करण्यात आलेल्या राणीची वाव पाटण येथे आहे. हे एक पायऱ्यांची विहिर आहे. 22 जून 2014 ला याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. सन 1063 मध्ये रामी उदयमतीने आपले पती आणि सोंलकी शासनाचे राजा भीमदेव यांच्या आठवणीत बांधले होते.

(Source)

मुंडेश्वरी देवी मंदिर (वर्ष 625 सी.ई)

बिहारमधील मुंडेश्वरी देवीचे मंदिर भारतातील सर्वात जुने मंदिर असल्याचे म्हटले जाते. भारतीय पुरात्त्व विभागानूसार, हे मंदिर 625 सी. ईमधील साका युगात बांधण्यात आले आहे. या मंदिराची रजना अष्टकोणात आहे.

(Source)

हुमायूचा मकबरा (वर्ष 1569)

वर्ष 1569-70 मध्ये निर्मित हा मकबरा दिल्लीत आहे. हा मकबरा मुघल वास्तूकलेचे प्रतिक आहे. या सुंदर मकबऱ्याची निर्मिती लाल दगड, ग्रेनाइट आणि पांढऱ्या संगमरवरी दगडांनी करण्यात आली आहे. या मकबऱ्याची वास्तूकला ताजमहालशी मिळती जुळती आहे.

(Source)

खजुराहोतील मंदिर (950 ए.डी)

मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात खजुराहो हे प्राचीन आणि मध्यकालीन मंदिरांपैकी एक आहे. येथे मोठ्या संख्येत हिंदू आणि जैन मंदिर आहेत. येथे लक्ष्मी मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदारिया महादेव मंदिर, सिंह मंदिर, देवी जगदंबा मंदिर, सुर्य मंदिर, विश्वनाथ मंदिर आहे.

(Source)

ग्वाल्हेरचा किल्ला (वर्ष 1486) –

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील किल्ला राजा मानसिंह तोमर यांनी बांधला होता. सुंदर कलाकृती, भिंती, नक्क्षीकाम आणि शिल्पकारीमुळे हा किल्ला सुंदर दिसतो. हा किल्ला राजा मानसिंह आणि राणी मृगनयमी यांच्या प्रेमाचे प्रतिक आहे.

(Source)

महाबलीपूरमचे स्मारक (7वे शतक) –

चेन्नईपासून 55 किमी लांब बंगालच्या खाडीतील महाबलीपूरम मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तामिळनाडूचे हे प्राचीन शहर आपल्या भव्यतेमध्ये, दगड कापून बनविण्यात आलेली मंदिरे, गुफा आणि समुद्र तटासाठी प्रसिद्ध आहे.

(Source)

सांची स्तूप (तिसरे शतक) –

सांची मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्हातील बेतवा नदीच्या किनाऱ्यावरील एक छोटेसे गाव आहे. सांची आपल्या प्राचीन बौद्ध स्मारकासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे स्मारक तिसऱ्या शतकापासून ते 12व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. येथे लहान-मोठे अनेक स्तूप आहेत, ज्यांना प्रेम, शांती, विश्वास आणि साहसाचे प्रतिक मानले जाते. सांचीचा मुख्य स्तूप सम्राट अशोकने बनवले होते.

(Source)

ताजमहाल (वर्ष 1632 )

आग्रा येथील ताजमहाल मुघल बादशाह शाहजहांने 1632 मध्ये पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधले होते. या किल्ल्याला 500 वर्ष झाली नसली तर जगातील प्रसिद्ध शहरांमध्ये या स्थळाचे नाव येतेच. वर्ष 1983 मध्ये ताजमहालने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवले.

(Source)

लाल किल्ला (वर्ष 1639) –

लाल किल्ला मुघल बादशाह शाहजहांने बांधले होते. याच्या भिंतीच्या लाल रंगामुळे याला लाल किल्ला म्हटले जाते. या ऐतिहासिक किल्ल्याला 2017 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी निवडण्यात आले.

Leave a Comment