जगातील पहिल्या रस्त्यासोबतच हवेत उडणाऱ्या कारचा लूक व्हायरल

जगातील पहिली जमिनीवर चालणारी आणि हवेत उडणारी कार अमेरिकेच्या मिआमी येथे सादर करण्यात आली. या कारचे नाव पल व्ही (PAL-V) –पायोनियर पर्सनल एअर लँडिंग व्हिकल असे आहे.  ही कार जमिनीपासून जवळपास 12500 फूट उंचावर उडू शकते.

या कारचा हवेतील अधिकतर वेग ताशी 321 किमी व जमिनीवरील अधिकतर वेग ताशी 160 किमी आहे.

(Source)

नेदरलँडची कंपनी असलेल्या कारचे उत्पादन सुरू झाले असून, आतापर्यंत 70 पेक्षा अधिक कारची प्री ऑर्डर्स आल्या आहेत. 2021 पर्यंत कारची डिलिव्हरी केली जाईल. कारची किंमत 599,000 डॉलर ( जवळपास 4 कोटी 28 लाख) आहे.

(Source)

कारमध्ये दोन लोक सहज बसू शकतात. यात 4 सिलेंडर इंजिन देण्यात आलेले आहे. 2 चाकी गाडी 10 मिनिटांच्या आत 3 चाकी होऊन गिरोकॉप्टरमध्ये बदलेल आणि 8 सेंकदामध्ये ताशी 0 ते 96 किमी वेग पकडू शकते.

ही कार कार्बन फायबर, टायटेनियम, एल्युमिनियमपासून बनविण्यात आली असून, याचे वजन 1500 पाउंड आहे. कारला टेकऑफसाठी 540 फूट रनवे आणि लँडिंगसाठी केवळ 100 फूट जागेची गरज असेल.

Leave a Comment