रिझ्यूममध्ये दिली खोटी माहिती; झाली 25 महिन्यांची शिक्षा

एका चांगल्या नोकरीसाठी रिझ्यूम अर्थात सिव्ही आकर्षक असणे गरजेचे असते. आकर्षक रिझ्यूममुळे चांगली नोकरी मिळण्यास मदत होते. मात्र एका महिलेला रिझ्यूममध्ये खोटी माहिती दिल्याने शिक्षा झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेरोनिका हिल्डा थेरियॉल्ट या महिलेने रिझ्युममध्ये खोटी माहिती देत ऑस्ट्रेलिया सरकारमधील डिपार्टमेंट ऑफ प्रिमियर अँन्ड कॅबिनेटमध्ये चीफ इंफोर्मेशन ऑफिसर ही भरपूर नोकरी मिळवली. या नोकरीसाठी तिने खोटा रेफ्रेंस, फेक पेय स्लिप आणि डॉक्टरचे हेल्थ सर्टिफिकेट तयार केले होते. याशिवाय तिने आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर प्रसिद्ध मॉडेलचा देखील फोटो लावलेला होता.

2017 मध्ये या महिलेला नोकरी लागली होती. मात्र एका महिन्याच्या आतच तिचे सत्य समोर आल्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सप्टेंबर 2017 मध्ये तिला व तिच्या भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

खोटी माहिती देणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आणि सार्वजनिक कार्यालयाच गैरवापर करणे या गुन्ह्यासाठी न्यायालयाने तिला 25 महिने कारावासाची शिक्षा दिली आहे व यातील 12 महिने तिला पॅरोल मिळणार नाही.

मात्र तिच्या वकिलांनी सांगितले की , महिलेला मानसिक आजार होता व तिने हा गुन्हा करण्याच्या आधी औषधे घेणे बंद केले होते. तिला बायपोलर डिसऑर्डर आहे.

Leave a Comment