31 डिसेंबरपूर्वी बदलून घ्या स्टेट बँकेचे जुने डेबिट कार्ड


मुंबई : भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक जर मॅग्नेटिक स्ट्राईपचे एटीएम कार्ड वापरत असतील त्यांना तात्काळ त्यांचे कार्ड बदलून घ्यावे लागणार आहे. कारण नव्या एटीएम कार्डमध्ये सेफ ईएमव्ही चीप देण्यात आली आहे. ग्राहकांना 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत हे कार्ड बदलून घेण्यासाठी बँकेने दिली आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्टेट बँकेने आपले सर्व मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड ईएमव्ही चीप आणि पिन बेस कार्डमध्ये बदलले आहेत. ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट कार्डला सेफ ईएमव्ही चीप कार्ड आणि पिन बेस स्टेट बँकेचे एटीएम कार्ड बदलून घेण्यासाठी आपल्या जवळच्या शाखेत करावा लागेल असे ट्विट बँकेने केले आहे. एटीएम आणि स्वाईप मशीनच्या माध्यमातून कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढत असल्या. त्यामुळे आरबीआयने मॅग्नेटिक कार्ड ईएमव्ही चीपमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. ईएमव्ही चीपच्या कार्डमधून क्लोनिंगची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कार्डची सुरक्षा वाढणार आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पैसे मॅग्नेटिक कार्ड बदलून घेण्यासाठी द्यावे लागणार नाही. मोफत आणि ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या शाखेतही हे बदलून मिळेल. जर यासाठी कुणी तुमच्याकडून पैसे घेत असेल, तर तातडीने बँकेत संपर्क करा, असेही स्टेट बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सेफ ईएमव्ही चीपसाठी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही ग्राहक अर्ज करु शकता. तुमच्या घरचा पत्ता अर्ज करण्याआधी अपडेट असणे गरजेचे आहे. कारण रजिस्टर पत्त्यावर कार्ड पाठवले जाईल. तर ऑनलाईन अर्ज करताना मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

Leave a Comment