नवउद्योजकांनी गुंतवणुकदारांसमोर कोणत्या गोष्टी मांडाव्यात ?, रतन टाटांनी दिल्या खास टिप्स

उद्योगपती रतन टाटा यांचे इंस्टाग्रामवर 7 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी रतन टाटा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असतात. नुकतेच रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर पिच डेक शेअर करण्याविषयी एक पोल घेतला. यामध्ये 97 टक्के फॉलोवर्सनी ‘हो’ असे मत दिले. अखेर रतन टाटा यांनी आपला शब्द पाळत नव उद्योजकांसाठी एक खास पिच डेक शेअर केले.

पिच डेक हे एक प्रकारे प्रेझेंटेशनसारखे असते. ज्यात उद्योजक गुंतवणूकदारांसमोर आपल्या उद्योजकाच्या आयडिया मांडत असतो. रतन टाटा यांनी टेम्पलेट शेअर करत 10 असे तत्व सांगितले, जे प्रत्येक नवउद्योजकाच्या पिच डेकमध्ये असायला हवे.

या टेम्पलेटची सुरूवात ‘समस्ये’पासून होते. ही समस्या प्रत्येक स्टार्टअप सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. यानंतर ‘उपाय’ आणि ‘युनिक सेलिंग प्रपोजिशन’ अर्थात ‘यूएसपी’ या गोष्टी स्टार्टअपला वेगळे ठरवतात.

त्यानंतर पिच डेकमध्ये ‘स्पर्धा आणि अडचणी’, ‘रेवेन्यू मॉडेल’ आणि ‘टार्गेट मार्केट’ या तत्वांचा उल्लेख आहे. त्यानंतर पिचमध्ये ‘वस्तू अथवा सेवां’चे स्पष्टीकरण हवे. ‘तुम्हाला गाठायचा टप्पा’, ‘आतापर्यंत मिळालेला फंड’ आणि तुमच्या ‘टिम’ची माहिती पिच डेकमध्ये असणे गरजेचे असल्याचे रतन टाटा यांचे म्हणणे आहे.

या पिच डेकद्वारे रतन टाटा यांनी एकप्रकारे नवउद्योजकांना गुंतवणूकदारांसमोर आल्या उद्योगाचे प्रेझेंटेशन कसे करायचे, याचे खास उदाहरण दिले.

रतन टाटा यांची ही पोस्ट त्यांच्या फॉलोवर्सला खूपच आवडली. या पोस्टला लाखांपेक्षा अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्सनी नवीन उद्योजकांना मदत करण्यासाठी रतन टाटांना धन्यवाद देखील म्हटले.

Leave a Comment