संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांना मिळणार नाही सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ

संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांना मिळणारी सबसीडी लवकरच समाप्त होणार आहे. संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांना जेवणावर सूट मिळत असे, आता ती सूट बंद होणार आहे. म्हणजेच आता खासदारांना त्यांच्या जेवणानुसार, पैसे द्यावे लागतील.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सुचनांनंतर बिझनेस एडवाइजरी कमिटीने या मुद्यावर चर्चा केली. यावर सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. संसदेच्या कँटिनमधून सबसीडी हटवल्यास, याद्वारे वर्षाला 17 कोटींची बचत होईल.

मागील लोकसभेत संसदेतील जेवणाचे भाव वाढवण्यात आले होते व सबसीडीचे बिल कमी करण्यात आले होते. संसदेत जेवणावर मिळणाऱ्या सबसीडीमुळे अनेकदा वाद झाले आहेत. काही दिवसांपुर्वी या कँटिनच्या रेट लिस्ट देखील व्हायरल झाली होती. सबसीडीमुळे खासदारांना संसदेत जेवण अगदी कमी किंमतीत मिळते.

2017-18 च्या संसदेत चिकन करी 50 रुपये, प्लेन डोसा 12 रुपये, व्हेज थाळी 35 रुपये, थ्री कोर्स लंच 106 रुपयांना मिळत असे. करदात्यांच्या जिवावर खासदारांना स्वस्तात जेवण मिळते, अशी टिका गेली अनेक दिवसांपासून होत होती.

Leave a Comment