भारतीयांच्या हातात आहे अमेरिकेच्या या 6 दिग्गज कंपन्यांची कमान

आज मूळ भारतीय वंशाचे नागरिक जगभरातील ग्लोबल कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. गुगलपासून ते मायक्रोसॉफ्ट सारख्या ग्लोबल कंपन्याचे नेतृत्व आज भारतीय व्यक्ती करत आहे. या इंडियन बॉसविषयी जाणून घेऊया.

सुंदर पिचाई –

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आता गुगलसोबत त्याची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे देखील सीईओ झाले आहेत. लॅरी पेज आणि सर्गे ब्रेन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ झाले. चेन्नईमध्ये मोठे झालेले सुंदर पिचाई या कंपनीचे आता सर्वोत मोठे बॉस झाले आहेत.

(Source)

सत्या नाडेला –

जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदी भारतीय वंशाचे सत्या नाडेला आहेत. 4 फेब्रुवारी 2014 ला त्यांची सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांना या कामासाठी वर्षाला 43 मिलियन डॉलर पगार मिळतो. जेव्ही त्यांनी कंपनी जॉइन केली होती तेव्हा कंपनीच्या एका शेअरची किंमत 32 डॉलर होती. आज 149 डॉलर झाली आहे. म्हणजेच 370 टक्के वाढ झाली आहे.

(Source)

शांतनू नारायण –

अमेरिकेची मल्टीनॅशनल कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर कंपनी अडोबीला देखील एक भारतीय बॉसच चालवतात. शांतून नारायण 2007 ला अडोबीचे चेअरमन आणि सीईओ झाले होते. शांतून यांना या जॉबसाठी 2017 मध्ये 22 मिलियन डॉलर मिळत होते.

(Source)

अजय बंगा –

अमेरिकन कंपनी मास्टरकार्डच्या सीईओपदी अजय बंगा हे आहेत. 2010 मध्ये अजय बंगा हे मास्टरकार्डचे सीईओ झाले होते. बंगा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या शेअरमध्ये 1396 टक्के वाढ झाली आहे.

(Source)

निकेश अरोरा –

अमेरिकेची मल्टीनॅशनल सायबर सिक्युरिटी कंपनी पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ भारतीय निकेश अरोरा हे आहेत. निकेश यांनी जून 2018 मध्ये हे पद स्विकारले होते. त्याआधी ते अनेकवर्ष गुगलमध्ये कार्यरत होते. याशिवाय ते सॉफ्ट बँक ग्रुपचे प्रेसिडेंट देखील होते. पालो आल्टोमध्ये त्यांना 128 मिलियन डॉलर पगार मिळाल्यानंतर ते चर्चेत आले होते.

(Source)

संजय मेहरोत्रा –

कॉम्प्युटर मेमरी आणि कॉम्प्युटर स्टोरेज डेटाचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी मायक्रॉन टेक्नोलॉजीचे सीईओ मूळ भारतीय असलेले संजय मेहरोत्रा हे आहेत. मेहरोत्रा सॅनडिस्कचे सहसंस्थापक होते. 2011 ते 2016 ते कंपनीचे सीईओ-प्रेसिडेंट होते. त्यानंतर ते मायक्रॉनमध्ये गेले.

Leave a Comment