या दृष्टीहीन गिर्यारोहकाने केली 450 फूट उंच पर्वतावर चढाई

ब्रिटनचा जेसी डफ्टन स्कॉटलँडच्या ‘ओल्ड मॅन ऑफ हॉय’ पर्वतावर चढाई करणारा पहिला ब्लाइंड क्लाइंबर ठरला आहे. जेसीने 450 फूट उंच पर्वतावर 7 तासात चढाई केली. ही चढाई पुर्ण करण्यासाठी त्याची होणारी बायको मॉली थॉम्प्सनने मदत केली. थॉम्प्सनने त्याला हेडसेटद्वारे वॉइस कमांड देत मदत केली.

जेसी आणि थॉम्प्सन 2004 पासून सोबत क्लाइंबिंग करत आहेत. लाल दगडांचा हा पर्वत स्कॉटलँडच्या नॉर्थ कोस्ट येथे आहे. जेसी म्हणाला की, हा पर्वात रिमोट एरियामध्ये आहे. त्यामुळे चढाई करणे थोडे अवघड आहे. हे समुद्राच्या किनाऱ्यावर असल्याने मी याची निवड केली. या पर्वतावर चढणारा पहिला ब्लाइंड क्लाइंबर बनायचे होते आणि ते मी झालो. क्लाइंबिंग करताना खूप लक्ष केंद्रित करावे लागते. कोणत्याही इतर गोष्टीबद्दल विचार करता येत नाही. केवळ या पर्वतावर चढाई कशी करायची याचा विचार करावा लागतो.

जन्माच्या वेळी जेसीची दृष्टी 20 टक्के होते. मात्र वय वाढल्यानंतर दिसणे अधिक कमी झाले. आता त्याची पाहण्याची क्षमता केवळ 1 टक्के आहे. जेसी सांगतो की, मला अनेक गोष्टी ओळखता येत नाही. मी केवळ लाइट कोठे लागली आहे, हे सांगू शकतो.

जेसीचे वडिल देखील गिर्यारोहक होते. जेसीने 2 वर्षांचा असताना सर्वात प्रथम क्लाइंबिंग केले होते. दृष्टी कमी असताना देखील 16 वर्षांपर्यंत तो रग्बी आणि जुजुत्सू खेळत असे.

Leave a Comment