हार्ट अटॅक, अल्झायमरच्या उपचारासाठी तयार करण्यात आला कृत्रिम न्यूरॉन

ब्रिटिश वैज्ञानिकांनी कृत्रिम न्यूरॉन तयार केला आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, सिलिकॉन चिपच्या रूपात तयार करण्यात आलेला न्यूरॉन हार्ट अटॅक, अल्जाइमर्स सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरेल. हा न्यूरॉन तयार करणाऱ्या बाथ युनिवर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, याला तयार करण्यासाठी ताकदवर मायक्रो-प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. मनुष्याच्या शरीरात कोट्यावधी न्यूरॉन असतात. ज्यांचे काम मेंदूद्वारे सूचना आदान-प्रदान करणे आणि विश्लेषण करणे हे काम असते.

नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधकांनुसार, कृत्रिम न्यूरॉन शरीरातील न्यूरॉनप्रमाणेच नर्व्हस सिस्टमच्या इलेक्ट्रिक सिग्नलला उत्तर देईल. शरीरात कार्यरत असलेले न्यूरॉन काम करणे बंद करतील त्यावेळी हा कृत्रिम न्यूरॉन फायदेशीर ठरेल. मणक्यात दुखापत झाल्यास देखील हा न्यूरॉन फायदेशीर ठरेल.

कृत्रिम न्यूरॉन शरीरात सुरू असलेली क्रिया सामान्य ठेवण्यास देखील मदत करेल. ह्रदयविकाराच्या वेळी मेंदूमध्ये असलेले न्यूरॉन ह्रदयापर्यंत सिग्नल पाठवत नाहीत, त्यामुळे ह्रदयात रक्तप्रवाह होत नाही. अशावेळेस हे न्यूरॉन फायदेशीर ठरेल.

वैज्ञानिकांनी सध्या हिप्पोकॅम्पल आणि रेसीपिरेटरी न्यूरॉन तयार केले आहेत. यातील एक मेंदूच्या हिप्पोकॅम्पल भागात आढळतो. तर रेसीपिरेटरी श्वासाला नियंत्रित करतो.

Leave a Comment