या ट्विटमुळे ट्रोल झाले मनोज तिवारी

4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जात असतो. या निमित्ताने दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले. मात्र या ट्विटमुळे मनोज तिवारी यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

मनोज तिवारी यांनी ट्विट केले की, अंत्यत साहस व निष्ठेने देशाची सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नौदल सैनिकांना नौदल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मात्र त्यांनी ट्विट करताना वापरलेल्या फोटोमुळे ते ट्रोल झाले. या फोटोमध्ये जहाजांवर अमेरिकेचा झेंडा दिसत आहे. लोकांनी मनोज तिवारी यांना अमेरिकेच्या ध्वजामुळे ट्रोल तर केले, मात्र सत्य काही वेगळेच आहे.

https://twitter.com/Prerityadav12/status/1202153942479597568

हा फोटो एका संयुक्त सरावाचा आहे. मालाबार सैन्य अभ्यासादरम्यान काढण्यात आलेला हा फोटो आहे. यावेळी भारत, अमेरिका आणि जापान या देशांच्या नौदलाने मिळून संयुक्त सराव केला होता.

मनोज तिवारी यांनी शेअर केलेला फोटा हा ‘आयएनएस राणा’चा आहे. मागील जहाज अमेरिकेचे आहे व याच फोटोमुळे नेटकरी मनोज तिवारी यांना ट्रोल करत आहेत.

Leave a Comment