मोटर विमा पॉलिसीमध्ये होणार हे मोठे बदल

तुमच्या मोटर विमा पॉलिसीमध्ये लवकरच तुम्हाला होणाऱ्या नुकसानाचे कवरेजचा भाग वेगळा दिसणार आहे. इंश्योरेंस रेग्युलेटर – आयआरडीएआयने वाहनांच्या मालकांना होणाऱ्या नुकसानाला कव्हर करणाऱ्या भागाची समिक्षा करण्यासाठी एक्सपोजर ड्राफ्ट जारी केला आहे. यामुळे मोटर विमा पॉलिसीमध्ये 6 मोठे बदल होवू शकतात.

प्रिमियम कस्टमाइज केले जावू शकते –

प्रिमियम कॅल्केल्युशनसाठी टेलिमॅटिक्सचा वापर करण्याची शिफारस मान्य करण्यात आली आहे. वर्किंग ग्रुपने आपल्या शिफारसीमध्ये म्हटले आहे की, टेलिमॅटिक्स डेटासाठी सेंट्रल रिपॉजिटरी म्हणजेच स्टोरेज आणि मेंटनेंस फॅसिलिटी बनविण्यात येऊ शकते. जेथे कॉमन पूलसाठी वेगवेगळ्या स्त्रोतातून डेटा जमा करता येईल. हा डेटा स्टोरेज करण्याचे काम इंश्योरेंस इंफॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया मॅनेज आणि प्रोटेक्ट करेल.

उपलब्ध डेटाच्या आधारावर तुम्ही गाडी कशी चालवता यानुसार तुम्हाला कव्हर ऑफर केला जाईल. विमा कंपन्या पॉलिसी देताना तुमची गाडी किती किमी चालली आहे आणि ड्रायव्हर कशा प्रकारे चालवतो या गोष्टीकडे लक्ष देतील. टेलिमॅटिक्स किंवा मोबाईल अॅपद्वारे मिळालेला ड्रायव्हर बिहेवियरचा डेटा चांगला असल्यास ग्राहकांना कमी किंमतीचा हफ्ता मिळेल.

डेप्रिसिएशन नियम –

पार्शियल लॉस क्लेममध्ये हे पाहिले जाईल की गाडी किती जुनी आहे. पॉलिसी बाजार डॉट कॉमचे मोटर विमा बिझनेस हेड प्रवीण चौधरी म्हणाले की, वेगवेगळे पार्ट्स, मेटरियल-ग्लास, फायबर, प्लास्टिकचे डेप्रिसिएशन मोजणे ग्राहकासाठी अवघड असते.  नवीन नियमात सर्व पार्ट्ससाठी डेप्रिसिएशनसाठी स्टँडर्ड ग्रिड प्रपोजल देण्यात आलेले आहे.

सम-एश्योर्डची मोजणी वेगळ्या पद्धतीने –

इरडाने खाजगी वाहने आणि दुचाकी वाहनांसाठी नवीन सम एश्योर्ड डिक्लेयर्ड वॅल्यू (आयडीव्ही) मोजण्यासाठी नियम तयार केले आहेत. जुन्या गाडीच्या बाबतीत सम एश्योर्डची रक्कम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सध्या बाजारातील गाडीच्या अजस्टेड डेप्रिसिएशन कमी करून काढेल. दुसऱ्या पर्यायात सुरूवातीच्या तीन वर्षात गाडीची किंमत कमी होणार नाही. 3 वर्ष ते 7 वर्ष जुन्या वाहनांच्या किंमतीत 40 ते 60 टक्के घट केली जावू शकते. त्यानंतर पुढील सम एश्योर्ड रक्कम कंपनी आणि ग्राहक मिळून ठरवतील.

फ्लड डॅमेज कव्हर –

सध्या बेस मोटर विम्यामध्ये पाणी शिरल्यामुळे इंजिनला होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिली जात नाही. यासाठी ग्राहकाला अॅड ऑन पर्याय निवडावा लागतो. ड्राफ्ट स्विकार केल्यास बेस पॉलिसीमध्ये हा कव्हर मिळेल.

नो क्लेम बोनस स्लॅब –

इरडाने नो क्लेम बोनससाठी स्टँडर्ड ग्रिडचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्या प्रत्येक विमा कंपनीचे लाँग टर्म विम्याचे स्वतःचे एनसीबी स्लॅब आहेत. दुसऱ्या कंपनीकडे गेल्यास समस्या येते. स्टँडर्ड एनसीबी ग्रिड आल्यास ही समस्या सुटेल. एनसीबी ग्राहकाशी लिंक असते, त्यामुळे ते नवीन गाडीला देखील लागू करता येते. ड्राफ्ट नॉर्म्स लागू असल्यास एनसीबी नवीन गाडीवर क्लेम करता येतो.

स्टँडर्डाइज डिडक्टेबल्स –

करंट कंपल्सरी डिडक्टेबल्स अशी रक्कम असते जी विमाधारकाला क्लेम प्रोसेस होण्याआधी आपल्या खिश्यातून द्यावी लागते. याला स्टँडर्ड डिडक्टेबल्स नाव देण्यात आलेले आहे आणि रिवाइज्ड डिडक्टेबल्सच्या सेटचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. उदाहराणार्थ, क्लेममध्ये एकूण नुकसानसहित सम एश्योर्डचे 1 टक्के अथवा 500 रुपये देखील अधिक असल्यास त्याचा दुचाकी वाहनचालकाला उचलावा लागेल. दुसऱ्या गाड्यांच्या बाबतीत सम एश्योर्डचा 1 टक्के अथवा 2500 रुपये असेल, मात्र 35000 रुपयांपेक्षा अधिक नसेल.

टोटल लॉसचे नियम –

गाडी चोरीला गेल्यास अथवा संपुर्ण नुकसानीचा क्लेम प्रकरणात इंश्योर्ड व्यक्तीला गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करावे लागेल. रद्द करण्यात आलेला आरसी सरेंडर केल्यानंतरच क्लेम सेटलमेंट होईल.

Leave a Comment