रक्तदाब, ग्लॉकोमाच्या 18 विविध औषधांद्वारे किडनी स्टोनचा उपचार शक्य, संशोधकांचा दावा

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी उच्च रक्तदाब आणि ग्लॉकोमाच्या (काचबिंदू) आजारामध्ये वापरण्यात येणाऱ्या 18 प्रकारच्या औषधांचा प्रयोग करून किडनी स्टोनचा सोपा उपचार शोधल्याचा दावा केला आहे. या औषधांच्या मिश्रणाने असे औषध तयार करण्यात आले जे किडनी स्टोनचा आकार कमी करते आणि त्याला लवकर बाहेर काढते.

या औषधांना कॅथेटरद्वारे थेट मुत्रवाहिनीत पोहचवले जावू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर मुत्रवाहिनीला शिथिल करण्यात आले तर स्टोन सहज बाहेर काढता येतो.

या टिममधील किडनी स्टोन उपसंचालक मायकल सीमा आणि ब्रायन ईस्नर म्हणाले की, संशोधकांनी पहिल्यांदाच उच्च रक्तदाब आणि मोतीबिंदूसाठी वापरण्यात येणाऱ्या 18 औषधांची निवड केली. त्यानंतर त्याचा संपर्क मानव मुत्रवाहिनी पेशींशी करण्यात आला. येथे मापता येणार होते की, ही औषध गुळगुळीत मांसपेशींच्या पेशींना किती आराम देते. याचे परिणाम खूपच चांगले आले.

संशोधकांनी 1 अब्ज पेशींचे विश्लेषण करण्यासाठी कम्प्युटेशनल प्रसंस्करणाचा वापर केला. या प्रयोगात एका सिस्टोस्कोपचा वापर करून औषधं थेट मुत्रवाहिनीत सोडण्यात आली. यामुळे संभावित वाईट परिणामांचा देखील धोका नसतो. संशोधनामध्ये तपासण्यात येत आहे की, औषध कितीवेळ मांसपेशीत राहू शकतील व स्टोनला किती वेळेत बाहेर काढता येऊ शकते.

Leave a Comment