अश्विनने नित्यानंदला विचारले ‘व्हिसा’ कसा मिळेल ?

बलात्काराचा आरोप असलेला आणि देशातून फरार झालेल्या बाबा नित्यानंदाने कैलासा नावाचा स्वतःचा देश स्थापन केल्याची, संविधान आणि स्वतंत्र ध्वज असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने यावर मजेशीर ट्विट केले आहे.

अश्विनने ट्विट करत लिहिले की, या देशाची व्हिसा मिळवण्याची काय प्रक्रिया आहे ? का व्हिसा आगमनावेळी मिळेल ?

अश्विनचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. एका युजरने ‘या देशात फिरायला जायचा विचार करत आहेस की नागरिकत्व स्विकारायच आहे ?’, असा प्रश्न विचारला. यावर अश्विनने देखील ‘दुहेरी नागरिकत्व अशी कोणतीही प्रक्रिया भारतात नाही’, असे म्हटले.

एका युजरने तर तू कैलासा देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार देखील होशील असे लिहिले.

दरम्यान, गुजरात पोलीस नित्यानंदचा अपहरण, लैंगिक अत्याचार या गुन्ह्यात शोध घेत आहेत.  रिपोर्टनुसार, त्याने दक्षिण अमेरिकेतील देश इक्वॅडोर येथील बेट विकत घेतले असून याला ‘कैलासा’ असे नाव दिले आहे व हे स्वतंत्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले आहे.  ही सर्व माहिती देशाची वेबसाईट Kailaasa.org वर देखील देण्यात आलेली आहे.

वेबसाईटनुसार, या देशाला पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ देखील आहे. याशिवाय वेबसाईटवर डोनेट करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे व देशाची नागरिकता देखील घेता येईल.

Leave a Comment