अहवाल : भारतातील 3 पैकी एका महिलेला येतात लैंगिक छळाचे कॉल-मेसेज

जगभरात स्पॅम कॉलद्वारे फसवणूक आणि छळ केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ट्रूकॉलर अॅपनुसार स्पॅम कॉलच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावर आहे. मागील वर्षी भारत या यादीत दुसऱ्या स्थानी होता. तसेच भारतातील तीनपैकी एका महिलेला नियमित लैंगिक छळ अथवा नको असलेले कॉल आणि एसएमएस येतात.

भारतात प्रत्येक मोबाईल युजरला महिन्याला 25.6 स्पॅम कॉल्स येतात. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे. ब्राझील पहिल्या स्थानावर असून, येथे प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला सरासरी 46 स्पॅम कॉल्स येतात. भारतातील एकूण स्पॅम कॉल्स पैकी 67 टक्के स्पॅम कॉल्स हे टेलिकॉम ऑपरेटर्सचे असतात. ज्यामध्ये नवीन ऑफर आणि रिमांडरची माहिती असते. स्पॅम एसएमएसच्या टॉप 20 देशांच्या यादीत इथोपिया पहिल्या क्रमांकावर आहे. येथे प्रत्येक युजरला महिन्याला 119 स्पॅम मेसेज येतात.

स्पॅम एसएमएसमध्ये भारत आठव्या स्थानावर आहे. भारतात युजरला महिन्याला 61 स्पॅम एसएमएस येतात. याशिवाय 17 टक्के कॉल टेलीमार्केटिंग, 10 टक्के फायनेंशियल सर्विस आणि 6 टक्के कॉल अन्य सोर्सचे असतात.

या यादीत अमेरिका देखील टॉप 10 मध्ये आहे. अमेरिकेत मागील वर्षीच्या तुलनेत स्पॅम कॉल्समध्ये 7 टक्के वाढ झाली आहे.

सर्वाधिक स्पॅम कॉल्सची वाढ लेबनानमध्ये झाली आहे. येथे सरासरी 2.8 वरून थेट 8.6 टक्के स्पॅम कॉल्स वाढले आहेत. याशिवाय स्पॅम कॉलमध्ये इंडोनेशियाने 16 व्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. टॉप 20 च्या यादीत पहिल्यांदाच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मलेशिया, लेबनान, नायजेरिया आणि इस्त्रालय या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment