आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट पुन्हा एकदा अव्वलस्थानी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मागे टाकले आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती, त्याचमुळे त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीनुसार, विराट 928 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर स्टिव्ह स्मिथ 923 अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे. एशेज मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर स्मिथ पहिल्या स्थानावर आला होता. मात्र पुन्हा एकदा विराटने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्कस लाबुशाने पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. तो 8व्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि न्यूझीलंडचा केन विल्मयसन तिसऱ्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. तर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन 9व्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाजा वेगवान गोंलदाज पैट कमिन्स अव्वलस्थानी आहे, तर रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

Leave a Comment