इंटरनेटचे व्यसन सोडण्यासाठी आता डिजिटल ‘उपवास’

पेमेंट्स आणि ई-कॉमर्स कंपनी इंस्टोमोजोचे सहसंस्थापक संपद स्वेन आठवड्याच्या शेवटी स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम बघत बसायचे. त्यांना याचे एवढे व्यसन लागले होते की, ते दिवसाला 10 तास याच्यावरच घालवायचे. मात्र आता संपद यांनी आपले हे इंटरनेटचे व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते विकेंडला दिवसाला जास्तीत जास्त 2 तासच फोनचा वापर करतात.

त्यांच्या प्रमाणेच अनेक टेक कर्मचारी इंटरनेटची सवय सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ते यासाठी एकप्रकारचा इंटरनेट मुक्त ‘उपवास’ ठेवत आहे. संपद याला ‘डिटॉक्स’ म्हणतात.

स्वेनने सांगितले की, स्ट्रिमिंग माझ्या आयुष्याचा एक भागच झाला होता. नेटफ्लिक्स सारख्या अॅप्सवर वेळ घालवणे कमी करून पुस्तक वाचण्यास सुरूवात केली. डिटॉक्सचा उद्देश नवीन गोष्टी शिकणे हा आहे.

इंटरनेटची सवय सोडण्यासाठी उपाय –

लोकांनी फोनपासून लांब रहावे. याशिवाय स्क्रीन फ्री संडे नावाचे कॅम्पेन, इंटरनेट फास्टिंगचा वापर आणि सुट्टीच्या दिवशी फोनचा वापर अजिबात करू नये.

निमहांसचे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मनोज कुमार शर्मा सांगतात की, इंटरनेट उपवासाचा निर्णय लोक स्वतः घेतता. यामध्ये ते इंटरनेटचा वापर बंद करून दुसऱ्या गोष्टींचा अनुभव घेतात. कोणीही गेमिंग अथवा स्ट्रिमिंगच्या भयकर सवय असलेला व्यक्ती आमच्याकडे आल्यास आम्ही त्याला गेम अथवा शो नंतर ब्रेक घेण्यास सांगतो. ब्रेकमुळे त्यांची आवड कमी होते.

सतत इंटरनेट वापरामुळे मानसिक आजार, डोळ्यांची समस्या, हात दुखणे, दमल्यासारखे वाटणे या सारख्या गोष्टी होतात.

निमहांसच्या 2018 च्या अभ्यासानुसार, 27.1 टक्के इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटची सवय खूप कमी आहे. 9.7 टक्के मध्यम तर 0.4 टक्के विद्यार्थ्यांमध्ये याची गंभीर समस्या पाहण्यास मिळाली.

Leave a Comment