चार रिअर कॅमेरे असणारा व्हिवोचा दमदार स्मार्टफोन लाँच

व्हिवो स्मार्टफोन कंपनी आपला नवीन स्मार्टफोन व्हिवो वाय 9एस लाँच केला आहे. व्हिवो वाय 9एस मागील आठवड्यात रशियात लाँच झालेल्या व्हिवो व्ही17 चे चीनी व्हेरिएंट आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, डायमंडच्या आकारचे रिअर कॅमेरे  आणि ग्रेडिएंट बँक पॅनेल देण्यात आलेले आहेत.

व्हिवो वाय 9एस च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1998 युआन ( 20,400 रुपये) आहे. चीनमध्ये 6 डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरू होईल.  या फोन ग्लेज्ड ब्लॅक, नेब्यूला ब्लू आणि सिंफनी ऑफ लाइट या रंगात उपलब्ध आहे.

(Source)

ड्यूअल सिम सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्राईड 9 पायवर आधारित फनटच ओएसवर चालतो. यामध्ये 6.38 इंच फूल एचडी+ (2340×1080 पिक्सल) सूपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसर मिळेल.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर व्हिवो वाय 9एसमध्ये डायमंडच्या आकाराचे क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सल असून, याशिवाय 8 मेगापिक्सल वाइल्ड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचे अन्य 2 कॅमेरे देण्यात आलेले आहेत. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

या फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी वीओएलटीई, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्लूटूथ, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Leave a Comment