आता केवळ 3 दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट

आता मोबाईल नंबर पोर्ट करणे सोपे होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथिरिटीने (ट्राय) मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीसाठी नवीन नियम जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार, 3 दिवसांच्या आत ग्राहक नंबर पोर्ट करू शकतील. तर दुसऱ्या लायसन्स एरियाचा नंबर 5 दिवसात पोर्ट होईल. मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीचे हे नवीन नियम 16 डिसेंबरपासून लागू होतील.

नवीन नियमांनतर 3 दिवसांच्या आत ग्राहक नंबर न बदलता दुसऱ्या ऑपरेटरमध्ये नंबर पोर्ट करू शकतील. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ लागतो.

मोबाईल नंबर पोर्टिबिलिटीमध्ये युजर आपला नंबर न बदलता एका ऑपरेटरमधून दुसऱ्या ऑपरेटरमध्ये  पोर्ट करतो. यासाठी युजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. हा यूनिक कोडच त्यांना नंबर पोर्ट करण्यास मदत करतो. नवीन नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सला प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 5.74 रुपये द्यावे लागतील. सध्या कंपन्यांना प्रत्येक ग्राहकांसाठी एजेंसीनी 19 रुपये द्यावे लागतात.

Leave a Comment