पुढील 2 वर्षात थायलंड होणार प्लास्टिक मुक्त

थायलंड सरकारने 2022 पर्यंत देशाला प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. थायलंडमधील नागरिकांच्या जेवणापासून ते वापरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वीच एका व्हेल माशाचा 80 पेक्षा अधिक प्लास्टिक बॅग खाल्यामुळे मृत्यू झाला होता. याच कारणामुळे थायलंडने सक्त पावले उचलण्याचे ठरवले आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, तीन वर्षात प्लास्टिकच्या पिशव्या, कप व इतर प्लास्टिक वस्तूंवर प्रतिबंध घालण्यात येईल. देशातील 43 मोठ्या कंपन्यांनी सर्व राज्य, नगरपालिका विभाग आणि मंत्रालयांची मदत घेऊन प्लास्टिक उत्पादन कमी करण्यासाठी योजना लागू केली आहे.

2021 पर्यंत सिंगल यूज प्लास्टिकवर पुर्णपणे बंदी आणण्यात येईल. त्याआधी कागद अथवा कापडाच्या बॅग तयार करण्यास सांगण्यात आले आहे. सरकार लोकांना या बदलामध्ये सहभाग घेण्याची मागणी करत आहे. सरकार या योजनेच्या पुढील टप्प्यात 2022 पर्यंत 36 मायक्रॉनपेक्षा अधिक जाड, पॉलिस्टायरीन खाद्य कंटेनर, प्लास्टिक कप यावर बंदी घालणार आहे.

Leave a Comment