का बरे या घड्याळात कधीच वाजत नाहीत 12

सर्वसाधारणपणे आपल्या देशात 12 आकडा शुभ समजला जातो. घड्याळात 12 कधी वाजतायेत याची देखील आतुरतेने वाट पाहिले जाते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जगात असेही एक घड्याळ ज्यात कधी 12 वाजतच नाही.

(Source)

हे विचित्र घड्याळ स्विझर्लंडच्या सोलोथर्न शहरात आहे. या शहरातील टाउन स्क्वेअरवर एक घड्याळ आहे. त्या घड्याळात तासांसाठी केवळ अकराच अंक आहेत. त्यातील 12 अंक गायब आहे. तसे या ठिकाणी अनेक घड्याळं आहेत, ज्यात 12 वाजतच नाही.

या शहराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील लोकांना 11 अंक खूप आवडतो. येथील कोणत्याही वस्तूची डिझाईन 11 अंकाच्या सारखीच असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या शहरातील चर्च आणि चॅपलची संख्या देखील 11-11 आहे. याशिवाय संग्रहालय, टॉवर यांची संख्या देखील 11 आहे.

(Source)

येथील सेंट उर्सुस चर्चमध्ये देखील 11 अंकाचे महत्त्व स्पष्ट दिसते. चर्च बनविण्यासाठी 11 वर्ष लागली. येथे जिन्यांचा सेट आहे. त्यातील प्रत्येक सेटमध्ये 11 पायऱ्या आहेत. याशिवाय येथे 11 दरवाजे आणि 11 घंटी आहेत.

(Source)

येथील लोकांना 11 अंकाचे एवढे वेड आहे की, 11 वा वाढदिवस देखील ते मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. भेटवस्तू देखील अकराच दिल्या जातात.

(Source)

11 अंकाचे वेड असण्यामागे जुनी कहानी आहे. सांगण्यात येते की, सोलोथर्नचे लोक खूप मेहनत करायचे, मात्र तरी देखील त्यांच्या आयुष्यात आनंद नव्हता. त्यानंतर पर्वतांमधून एल्फ येण्यास सुरूवात झाली व त्यांचे आयुष्यच बदलून गेले. एल्फच्या बाबतीत जर्मनीच्या पौराणिक कथांमध्ये वाचायला मिळते. सांगण्यात येते की, त्यांच्याकडे अफाट शक्ती होती आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 होतो. त्यामुळे येथील लोकांनी एल्फला 11 अंकाशी जोडले आणि तेव्हापासून 11 अंकाला महत्त्व देण्यास सुरूवात केली.

Leave a Comment