फेडररच्या सन्मानार्थ स्विझर्लंड सरकारने जारी केले नाणे

स्विझर्लंडच्या सरकारने स्टार टेनिसपटू रॉजर फेडररच्या सन्मानार्थ 20 फ्रँकचे नाणे लाँच केले आहे. स्विझर्लंडमध्ये फेडरर पहिला असा जिवित व्यक्ती आहे, ज्याच्या सन्मानार्थ नाणे जारी करण्यात आले आहे.

स्विसमिंटनुसार, फेडररचा बँकहँड करतानाचा फोटो असणारे 55 हजार नाणी बनविण्यात आली आहेत. स्विसमिंट 50 फ्रँकचे 40 गोल्ड कॉइन मे मध्ये बाजारात आणेल. स्विसमिंटने सांगितले की, ही चांदीची नाणी जानेवारी 2020 मध्ये जारी करण्यात येतील.

38 वर्षीय फेडररने ट्विट करून स्विझर्लंड सरकारचे आभार मानले. फेडररने आतापर्यंत 20 ग्रँड स्लँम जिंकले आहेत.

Leave a Comment