शेतकऱ्यांच्या योजनेतून कर्जमाफीच्या अफवेवर भडकला रितेश


मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून कागदपत्राचा फोटो मधू यांनी शेअर करत चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज देशमुख बंधुंनी माफ करून घेतल्याचे म्हटले आहे.


मधू यांच्या ट्विटला उत्तर देत रितेशने यात काही तथ्य नसल्याचे म्हटलं. कागदपत्राचा जो फोटो मधु किश्वर यांनी शेअर केला आहे की, त्यात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या रितेश आणि अमित देशमुख या दोन मुलांनी ४ कोटी ७० लाखांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज माफी योजनेतून घेऊन स्वतःचे कर्ज माफ करुन घेतल्याचा दावा केला आहे.

रितेशने त्याचपाठोपाठ दुसरे ट्विट करत आपले स्पष्टीकरण दिले असून रितेश म्हणाला की, जे कागदपत्र मधु किश्वर यांनी दाखवले ते पूर्णतः खोटे असून त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. जे या कागदपत्रात नमूद केले आहे, अशा प्रकारचे कोणतेही कर्ज मी आणि माझ्या भावाने घेतले नाही. कृपया जनतेची दिशाभूल करू नका. मधुपूर्णिमा यांनी यानंतर रितेशची ट्विटरवरूनच माफी मागितली, त्यांनी आपले ट्विट देखील डिलीट केले आहे

Leave a Comment