चक्क 12व्या वर्षी हा विद्यार्थी देणार 10 वीची परिक्षा

दहावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वसाधारण वय हे 15 ते 16 वर्ष असते. मात्र मणिपूरमधील एक विद्यार्थी चक्क 12 व्या वर्षीच दहावीची परिक्षा देणार आहे. मणिपूरच्या चुराचंद्रपूर जिल्ह्यातील कांगवेई गावात राहणाऱ्या 12 वर्षीय आयझॅक पॉललुंग मुआन वाईफेईने सिद्ध केले आहे की, त्याच्या नावातील न्यूटन यांचे नाव का योग्य आहे. 12 वर्षीय आयझॅक चक्क दहावीची परिक्षा देणार आहे.

सध्या आठवती शिकत असलेला आयझॅक इंफालमधील सर्वात कमी वयात दहावी देणारा विद्यार्थी ठरला आहे. यासाठी बोर्ड ऑफ सेंकेंडरी एज्युकेशनने देखील परवानगी दिली आहे. आयझॅकची मनोवैज्ञानिक चाचणी करण्यात आली, त्यानंतर बोर्डाने स्पेशल केस म्हणत परिक्षेस परवानगी दिली.

यावर आयझॅक म्हणाला की, बोर्डाच्या निर्णयाने आनंदी आहे. याशिवाय आयझॅक न्यूटन यांचा देखील प्रशंसक आहे. कारण त्याला वाटते की, तो त्यांच्यासारखा आहे व त्यांचाप्रमाणेच त्याचे नाव आहे. बोर्डाच्या नियमांनुसार 15 वर्ष पुर्ण करणारा कोणताही विद्यार्थी दहावी देऊ शकतो. मात्र आयझॅक 12 वर्षातच दहावी देणार आहे.

बोर्डाने घेतलेल्या मनोवैज्ञानिक चाचणीत सिद्ध झाले की, त्याचे मानसिक वय 17 वर्ष 5 महिने आहे.  म्हणजेच जे 17 वर्षांच्या एका विद्यार्थ्याला समजते, ते आयझॅकला आताच समजत आहे.

Leave a Comment