Video : चक्क हवेत उडवत या पठ्ठ्याने सोडवले 3 रूबिक क्यूब्स - Majha Paper

Video : चक्क हवेत उडवत या पठ्ठ्याने सोडवले 3 रूबिक क्यूब्स

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हा व्हिडीओ बघून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रूबिक क्यूब्सला जगलिंग (हवेत उडवत) करत सोडवत आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 7 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://twitter.com/CucumberTonic/status/1200196486476304384

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आधी तीन रूबिक क्यूब्स कॅमेऱ्यात दाखवतो. त्यानंतर तिन्ही रूबिक क्यूब्स हवेत उडवत सोडवण्यास सुरूवात करतो. व्हिडीओ संपेपर्यंत या व्यक्तीने तिन्ही रूबिक क्यूब्स सोडवलेले असतात.

हा भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. जे रूबिक क्यूब सोडवण्यास अनेक जणांना महिने लागतात. ते या पठ्ठ्याने हवेत उडवत सहज सोडवून दाखवले आहे.

अनेक युजर्स हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे. तर काही युजर्सनी हा व्हिडीओ रिव्हर्समध्ये चालवण्यात आला असून, ज्यामुळे रूबिक क्यूब्स सोडवल्यासारखे वाटत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment