नीलम गोऱ्हेंचे पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य


पुणे : सध्या राज्यभरात भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चांचा जोर धरु लागला आहे. आता यावर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

आमचे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे कुटुंबियांसोबत राजकारणापलीकडचे नाते असून मुंडे कुटुंबियांसोबत वेगळा संवाद आहे. शिवसेनेने पंकजा यांच्याविरोधात उमेदवारही दिला नव्हता. 12 डिसेंबरला अजून नऊ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत वेट अँड वॉच, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल सूचक वक्तव्य केले आहे.

आज पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपतीचे नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतल्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही. त्याचबरोबर सत्ता मिळवण्यासाठी गलिच्छ राजकारण केले नाही. उद्धव ठाकरे 5 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहतील. शरद पवार यांची वडीलकीची भूमिका असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर आता पुण्याच्या टेकड्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे नक्की वाचतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र सरकार दाऊदलाही क्लीन चिट देईल या टीकेला उत्तर देताना दाऊदला परत आणणे हे केंद्र सरकारचे काम असून या बाबत राज्य सरकार सर्वोतपरी मदत करेल. शेतकऱ्यांचा रोजगार बुलेट ट्रेन किंवा नाणार या सारख्या प्रकल्पामुळे हिरावून घेतला जात असेल आणि लोकांचा विरोध असेल तर उद्धव ठाकरे आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतील.

Leave a Comment