श्रीमंतांची आवड असलेल्या या 4 कार भारतात झाल्या ‘फेल’

जगातील सर्वात मोठा लग्झरी इव्हेंट असलेला लाँस एंजेलिस ऑटो शो 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. येथे प्रदर्शित केलेल्या कार्सची जगभरात मागणी केली जाते. मात्र अशा अनेक कार्स आहेत, ज्यांची जगभरात चलती आहे मात्र भारतात या कार्सनी एकही ग्राहक मिळालेला नाही. या कार्सबद्दल जाणून घेऊया.

बुगाटी वेरॉन –

जेव्हा गोष्ट स्पीड, पॅशन, स्टाइल आणि लुक्सची होते, त्यावेळी सर्वात प्रथम नाव बुगाटी वेरॉनचे येते. लूक आणि जबरदस्त इंजिन क्षमतेमुळे वेरॉन जगातील सर्वात वेगवान कार आहे. 2010 मध्ये ही कार भारतीय बाजारात लाँच करण्यात आली होती. त्यावेळी याची किंमत 12 कोटी रुपये होती. कारच्या किंमतीमुळे एकही ग्राहकाने ही कार खरेदी केली नाही.

Koenigsegg Agera –

स्वीडिश कंपनी Koenigsegg ने आपली हायपरकार अगेराला भारतीय बाजारात लाँच केले होते. कंपनीने भारतीय बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी इंटरग्लोब जनरल एव्हिशनसोबत टायअप देखील केले. कंपनीने या कारमध्ये 5.0 लीटर क्षमतेचे व्ही8 इंजिन दिले आहे. जे 947 बीएचपीची पॉवर आणि 1100 एनएम टॉर्क देते.

गमपेर्ट अपोलो –

जर्मनीची प्रसिद्ध कंपनी गमपेर्टने अपोलो ही कार भारतीय बाजारात लाँच केली होती. Koenigsegg Agera प्रमाणेच गमपेर्टने देखील अपोलोला त्याच एव्हिएशन कंपनीद्वारे बाजारात लाँच केले होते. या कारमध्ये कंपनीने 4.2 लीटर क्षमतेचे ट्वीन टर्बो व्ही8 इंजिन दिले आहे. जे 650 बीएचपीची पॉवर आणि 850 एनएम टॉर्क जनरेट करते.

एस्टॉन मार्टीन वन-77 –

ब्रिटिश कंपनी एस्टॉन मार्टीनच्या कारचे चाहते जगभरात आहेत. जेम्स बाँड चित्रपटात देखील या कंपनीच्या कारचा वापर करण्यात आलेला आहे. कंपनीने वर्ष 2010 मध्ये एस्टॉन मार्टीन वन-77 कार भारतीय बाजारात सादर केली होती. या मॉडेलच्या केवळ 77 युनिटचेच उत्पादन करण्यात आले होते. एक डेमो मॉडेल मुंबई डीलरशीपमध्ये आणण्यात आले होते. मात्र एक देखील कारची विक्री झाली नाही.

 

Leave a Comment