हरवलेल्या पाळीव प्राण्यांचा शोध घेणारा डिटेक्टिव्ह


चीन मध्ये सध्या एका खास खासगी डिटेक्टिव्हची चर्चा जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे हा डिटेक्टिव्ह स्पेशल आहे कारण तो हरविलेल्या पाळीव प्राण्यांचा शोध घेऊन त्याच्या मुळ मालकांना परत करतो. चीनमध्ये असे काम करणारा हा बहुदा एकमेव डिटेक्टिव्ह आहे. हरवलेला पाळीव प्राणी शोधून देण्यासाठी तो ८० हजार फी आकारतो असेही समजते.

सन जिनराँग असे त्याचे नाव असून त्याने आत्तापर्यंत हरविलेले सुमारे १ हजार पाळीव प्राणी शोधून मालकांना परत केले आहेत. हा शोध घेण्यासाठी तो अत्याधुनिक उपकरणाचा वापर करतो आणि या उपकरणांची किंमतच मुळी हजारो डॉलर्स आहे. सन ने स्वतंत्र कंपनी त्यासाठी स्थापन केली असून त्याच्या हाताखाली १० लोक काम करतात.

सन सांगतो आमच्याकडे येणारे कॉल बहुतेक वेळी मध्यरात्री नंतर येतात कारण तेव्हाच आपला पाळीव प्राणी घरात आलेला नाही हे लोकांच्या लक्षात येते. हे कॉल संपूर्ण देशातून कुठूनही येतात. मग सनची टीम कामाला लागते. सन सांगतो चीन मध्ये पाळीव प्राणी हरविण्यापेक्षा ते चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः कुत्री मासांसाठी चोरून विकली जातात. त्यांना किंमत जास्त मिळते. सनने या संदर्भात मोठा डेटा गोळा केला आहे. त्यावरून प्राणी चोरीला गेला की या डेटाचे विश्लेषण करून त्याला तपासाचा मार्ग ठरविता येतो. या तपासात सनचे यशस्वी होण्याचे प्रमाण ७० टक्के आहे असे समजते.

Leave a Comment