चंद्राच्या पृष्ठभागावर सापडले विक्रम लँडर


अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा ने भारताच्या इस्रोने सोडलेल्या चांद्रयान दोन मधील विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधला असून त्याचे फोटो ट्विटरवर प्रसिध्द केले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरने जेथे हार्ड लँडिंग केले ती जागा आणि विक्रमचे अवशेष यात दिसत असून नासाच्या लुनार रिक्गनीसेन्स ऑर्बीटर कडून हे फोटो क्लिक केले गेले असल्याचे म्हटले आहे.

इस्रोच्या चांद्रयान दोन मोहिमेनुसार ७ सप्टेंबर रोजी विक्रम लँडर चंद्राच्या निर्धारित केलेल्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित होते. त्यानुसार विक्रम चांद्रयान दोन पासून सुटा झाला आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे जात असताना ३० किमी अंतरावर त्याचा संपर्क तुटला. विक्रमचे सॉफ्ट लँडिंग होणे अपेक्षित होते मात्र त्याचा वेग कमी न करता आल्याने त्याचे हार्ड लँडिंग झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून विक्रमचा ठावठिकाणा लावण्याचा प्रयत्न सुरु होता त्यात अखेर नासाला यश आले असून विक्रम लँडरचे तीन तुकडे फोटोत दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment