हुंडा आणि वरातीविना बबिता फोगटचा विवाह संपन्न


कॉमनवेल्थ गोल्ड मेडलीस्ट आणि दंगल गर्ल बबिता फोगट रविवारी रात्री भारत केसरी विवेक सुहाग याच्या बरोबर तिच्या बलाली गावात विवाहबद्ध झाली. हा विवाह सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. या विवाहात हुंडा घेतला गेला नाही, वरात निघाली नाही तसेच जेवणात प्लास्टिक वस्तूंचा वापर केला गेला नाही. बबिता आणि विवेकने विवाहाच्या सात फेऱ्यांबरोबर आठवा फेरा घेऊन बेटी बचाव, बेटी पढाओ असा संदेश दिला. या विवाहाला दोन्ही घरातील जवळचे नातेवाईक उपस्थित होते. बाराती मध्ये फक्त २१ पाहुणे आले होते.

सोमवारी दिल्लीत या विवाहानिमित्त स्वागत समारंभ झाला. त्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर, राजकारणी तसेच परदेशी पहिलवान उपस्थित होते असे समजते. बबिता आणि विवेक गेली पाच वर्षे डेटिंग करत होते. बबीताने ऑगस्टमध्येच भाजप प्रवेश करून हरियाना विधानसभा निवडणूक लढविली होती मात्र त्यात तिला अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

Leave a Comment