‘ही’ हॉट अभिनेत्री झाली दक्षिणेत भाजपचा चेहरा - Majha Paper

‘ही’ हॉट अभिनेत्री झाली दक्षिणेत भाजपचा चेहरा


चेन्नई – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा शनिवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नमिता आणि अभिनेते राधा रवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नमिता आणि राधा रवी यांना यावेळी पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठी या कार्यक्रमाला गर्दी गेली होती.

बिल्ला, इंग्लिश करन, जगन मोहिनी यासारख्या चित्रपटांत अभिनेत्री नमिता हिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. २००१ मध्ये मिस सुरतचे जेतेपद नमिता हिने जिंकले तर मिस इंडियाची उपविजेती राहिली आहे. दक्षिण भारतात नमिता हिचा मोठा चाहतावर्ग आहे. एका चाहत्याने कोयंमतूरमध्ये नमिताचे मंदिर उभारले होते. नमिता हिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे मोठा चाहतावर्ग असून चाहत्यांमध्ये ती कायम चर्चेत असते.

दरम्यान याआधी अभिनेते राधा रवी डीएमके या पार्टीत होते. त्यांना पक्षातून अभिनेत्री नयनताराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बडतर्फ करण्यात आलं होते. आता राधा रवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिशन दक्षिण अंतर्गत तामिळनाडूमध्ये भाजपने आपला प्रभाव वाढवायला सुरूवात केली आहे. नड्डा यांनी शनिवारी चेन्नईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तमिळनाडूचे भवितव्य तुम्ही लोकांनी बदलण्याचे ठरविले आहे. येत्या काळात भाजप येथील बळकट राजकीय पक्ष म्हणून उभारी घेईल.

Leave a Comment