केंद्रातील मोदी सरकारला ऐकायची नाही अर्थव्यवस्थेवरील टीका


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारवर उद्योगपती राहुल बजाज यांच्यापाठोपाठ बिकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुझूमदार यांनी देखील टीका केली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोणतीही टीका मोदी सरकारला ऐकायची नसल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.

उद्योगपती राहुल बजाज यांनी देशातील नागरिक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यास घाबरतात, अशी टीका केली होती. त्यानंतर सरकारवर किरण मुझूमदार यांनीही ट्विट करत टीका केली. सरकारपर्यंत मागणी आणि विकासदराला चालना देण्यासाठी उपाय करण्याचा संदेश पोहोचला असेल, अशी आशा असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. वाळीत आम्हाला टाकल्यासारखे असल्यामुळे आमची अर्थव्यवस्थेवरील टीका सरकारला ऐकायची नसल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

शनिवारी मुंबईमधील कार्यक्रमात बोलताना बजाज यांनी भीतीदायक वातावरण असल्याची टीका केली. लोकांना सरकारवर टीका करायला भीती वाटते. सरकारकडून टीका विचारात घेतली जाईल, यावर लोकांचा विश्वास नाही, असेही बजाज यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सरकारी यंत्रणेकडून छळवणूक होत असल्याने भीतीत राहत असल्याने अनेक उद्योगपतींनी आपल्याला सांगितल्याचे नुकतेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.

Leave a Comment