रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमुळे नेटकरी भावूक


बारामती : राज्यातील सत्तासंघर्षामुळे मागील महिनाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच राजकीय नेत्यांच्या सभा आणि त्याबरोबरच बैठकांमुळे त्यांचे कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते. पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणनू पोहचलेल्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून रोहित पवारांनी आपण रोजच्या कामातून वेळ काढून कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

आमदार रोहित पवार आणि डॉ.विश्वजित कदम हे अधिवेशनाचे कामकाज संपवून एकाच गाडीने प्रवास करताना त्यांनी वाटेत खेळण्याचे दुकान पाहिले. दुकानात जाण्याचा मोह दोघांनाही आवरता आला नाही. रोजची कामाची गडबड, त्यात वारंवार होणारे दौरे त्यामुळे कुटुंबियांसाठी वेळ मिळत नाही. घरी मुलांना आमची वारंवार आठवण येते. पण राजकारणाच्या सगळ्यात मोठ्या कुटुंबात वावरताना घरच्यांकडे दुर्लक्ष होते, असे पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटले आहे.

Leave a Comment