स्वसंरक्षणासाठी महिला पर्समध्ये सहज बाळगू शकतात हलक्या वजनाची 'निर्भीक' रिव्हॉल्व्हर - Majha Paper

स्वसंरक्षणासाठी महिला पर्समध्ये सहज बाळगू शकतात हलक्या वजनाची ‘निर्भीक’ रिव्हॉल्व्हर

सात वर्षांपुर्वी दिल्लीतील निर्भया प्रकरणाने संपुर्ण देश हदरला होता. आता हैदराबादमध्ये देखील पुन्हा एकदा महिला डॉक्टरबरोबर तशीच घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे. महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन 2014 मध्ये हलकी निर्भीक रिव्हॉल्व्हर बाजारात आणण्यात आली होती.

निर्भया प्रकरणाने प्रेरित असल्याने या रिव्हॉल्व्हरचे नाव निर्भीक ठेवण्यात आले आहे. 18 मार्च 2014 ला कानपूरमध्ये या रिव्हॉल्व्हरचे उद्घाटन करण्यात आले होते.

जुलैपर्यंत 2500 रिवॉल्वर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये विकल्या गेल्या आहेत. या रिवॉल्वरचे वजन 500 ग्रॅम आहे. तर सर्वसामान्य रिव्हॉल्व्हरचे वजन 700 ग्रॅम असते. या रिवॉल्वरची किंमत 1.20 लाख रुपये आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर याची किंमत वाढून 1.40 लाख रुपये झाली आहे.

निर्भीकद्वारे सहज 10 मीटरच्या भागात निशाणा साधता येतो. मात्र ऑर्डिनेंस फॅक्ट्रीने दावा केला आहे की, रिवॉल्वर 15 मीटर रेंज आणि 0.32 (7.65 मिमी) बोर कॅलिबरसोबत येते. निर्भीकचे टायटेनियम एलॉय मेटलपासून बनविण्यात आलेले आहे, ज्यामुळे गंज लागत नाही. महिला आपल्या हँडबँगमध्ये ही रिव्हॉल्व्हर सहज बाळगू शकतात.

Leave a Comment