आजच बंद करा लॅपटॉपमधील स्लीप मोडचा वापर, नाहीतर होईल मोठे नुकसान

आज कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत सर्वच ठिकाणी लॅपटॉपचा वापर होतो. टेक कंपन्या देखील आपल्या ग्राहकांसाठी लॅपटॉपमध्ये अनेक खास फीचर्स देत असतात. मात्र काही दिवसांपुर्वीच लॅपटॉपला आग लागल्याची घटना समोर आली असून, यासाठी स्लीप मोडला जबाबदार धरण्यात आलेले आहे. या मोडमुळे लॅपटॉपच्या बॅटरीला देखील मोठे नुकसान होते. अनेक विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, लॅपटॉप स्लीप मोडच्या ऐवजी शट डाउन करणे कधीही चांगले आहे.

अनेकजण वारंवार लॅपटॉप उघडण्यासाठी लागणाऱ्या वेळेपासून वाचण्यासाठी स्लीप मोडचा वापर करतात. लॅपटॉपचा वापर खूप वेळेपर्यंत झाला नाही तर लॅपटॉप आपोआप स्लीप मोडमध्ये जातो. याशिवाय स्टार्ट बटनद्वारे देखील स्लीप मोड सुरू करता येतो. या फीचरमध्ये लॅपटॉपच्या बॅटरीला धोका निर्माण होतो व ज्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.

या गोष्टींची घ्या काळजी –

जास्त वेळ लॅपटॉपला स्लीप मोडमध्ये ठेवू नका. यामुळे बॅटरी लवकर खराब होते. लॅपटॉपच्या मॉनिटर आणि सीपीयूवर देखील याचा परिणाम होतो. स्लीप मोडद्वारे लॅपटॉपची बॅटरी गरम होते, ज्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.

स्लीप मोडचे फायदे –

स्लीप मोडमुळे डिव्हाईस वारंवार पुन्हा सुरू करावा लागत नाही. स्लीप मोडद्वारे काम जेथे सोडले आहे, तेथूनच पुन्हा सुरू करता येते. याशिवाय लॅपटॉपला अधिक चार्ज देखील करू नये. यामुळे बॅटरी गरम होते व आग लागू शकते.

हायबरनेशन मोड –

युजर्स लॅपटॉपवर स्लीप मोडच्या ऐवजी हायबरनेशन मोडचा वापर करू शकतात. या मोडमुळे लॅपटॉपच्या बॅटरीला देखील नुकसान होत नाही. या मोडद्वारे लॅपटॉपवरील काम स्नॅपशॉट विंडोवर सेव्ह करता येते.

जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर हायबरनेशन मोड सुरू करायचे असेल तर यासाठी सर्वात प्रथम की-बोर्डवर स्टार्ट+आर बटन सोबत दाबा. त्यानंतर विंडो पॉवरचे ऑप्शन ओपन होईल. त्यानंतर तुम्ही पॉवर बटनद्वारे स्लीप मोडच्या जागी हायबरनेशन मोड निवडू शकता.

Leave a Comment