हाँगकाँगच्या रस्त्यावर झळकले ‘धन्यवाद राष्ट्रपती ट्रम्प’चे फलक

हाँगकाँगवासीयांचा चीनविरुद्ध सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. रविवारी हाँगकाँगमध्ये शेकडो निदर्शक अमेरिकन दुतावासाकडे कूच केली. यात अनेक वृद्धांचा समावेश होता. त्यांनी सरकार विरोधी प्रदर्शनामध्ये अमेरिकेच्या मदतीसाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. हे निदर्शक ‘थँक्यू प्रेसिडेंट ट्रम्प’ असे फलक घेऊन होते. एका बॅनरवर लिहिले होते, ‘राष्ट्रपती ट्रम्प, कृपया हाँगकाँगला स्वातंत्र्य करा.’

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यातच हाँगकाँग मानवाधिकार आणि लोकतंत्र कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. याला अमेरिकेच्या सीनेट आणि प्रतिनिधीसभा या दोन्ही संसदेमधून पास करण्यात आले आहे. या कायद्यानुसार, हाँगकाँगला मिळालेल्या विशेष दर्जावर लक्ष देण्यात येईल. याशिवाय हाँगकाँगला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संबधित प्रावधानांवर विचार केला जाईल. दुसरा कायद्यानुसार, हाँगकाँग पोलीस गर्दी नियंत्रणात करण्यासाठी वापरत असलेली साधने, पेपर स्पे, रबराच्या गोळ्या, स्टेन गन इत्यादींच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येईल.

हाँगकाँगमध्ये काल देखील शेकडो निदर्शक काळी कपडे घालून रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला. एक आठवड्यांपुर्वी झालेल्या जिल्हा परिषदेचे निवडणुकीत हाँगकाँग समर्थकांना मोठा विजय मिळाला होता.

 

Leave a Comment